विक्रीपत्र — माहिती भरा

खालील रकाने भरा — उजवीकडे दस्तऐवज आपोआप तयार होत जाईल. लिहून घेणार व लिहून देणार यांची संख्या टाका — तितकी माहिती-चौकटी आपोआप दिसतील. सर्व माहिती भरून झाल्यावर खालचे "प्रिंट / PDF सेव्ह करा" बटण दाबा.

जमीन / व्यवहार तपशील
विक्रीपत्र लिहून घेणार (खरेदीदार)
विक्रीपत्र लिहून देणार (विक्रेता)
चतुःसीमा
दस्त दिनांक व टायपिस्ट
साक्षीदार क्र. 1
साक्षीदार क्र. 2

टीप: हे टेम्पलेट फक्त मजकूर तयार करण्यासाठी आहे. विक्रीपत्र कायदेशीररीत्या वैध व नोंदणीकृत होण्यासाठी योग्य मुद्रांक शुल्क भरून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम मजकूर वकील/दस्तलेखकाकडून तपासून घ्यावा.

विक्रीपत्र

हे विक्रीपत्र कायमस्वरुपी असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचा सावकारी व्यवहार नाही.

विक्रीपत्र चे मौजे ता.जि. येथील गट क्रमांक मधील क्षेत्र हे.आर. ची शासकीय किंमत रक्कम रुपये /- प्रत्यक्ष विक्री किंमत रक्कम रुपये /- झोन नंबर , दर /- प्रती आर. प्रमाणे सादर विक्रीपत्र दस्त नोंदणी साठी जोडलेला मुद्रांक शुल्क रक्कम रुपये - /- व नोंदणी फी - /- ई-चलना द्वारे भरणा केलेला आहे.

विक्रीपत्र लिहून घेणार :-

!! यांच्या हक्कात !!

विक्रीपत्र लिहुन देणार :-

कारणे सदरचे विक्रीपत्र लिहून देतो जे की, जिल्हा व जिल्हा परिषद तालुका पंचायत समिति रजि.तु.पो.तु. ग्रामपंचायत मौजे येथील गट नंबर मधील ज्याचे एकूण क्षेत्रफळ हे.आर व आकारणी असुन सदर गटामध्ये माझ्या मालकी हक्काची असणारी शेतजमीन ज्याचे एकूण क्षेत्रफळ हे.आर. या पैकी हे. आर मी तुम्हास माझ्या संपुर्ण मालकी हक्कासह कायम स्वरूपी विक्री केली आहे.

विक्री शेतजमिनीची चतुः सिमा खालीलप्रमाणे आहे.

पुर्वेस
—
पश्चिमेस
—
दक्षिणेस
—
उत्तरेस
—

वरील चतुः सिमेच्या आतील वर वर्णन केलेली संपुर्ण शेतजमीन संपुर्ण मालकीहक्कासह मी तुम्हाला एकुण किंमत रक्कम रुपये /- (अक्षरी ) मध्ये कायमस्वरुपी विक्री केली आहे.

सदर विक्री शेतजमिनीची संपुर्ण किंमत रक्कम रुपये (अक्षरी ) आम्हाला तुमच्याकडुन नगदी स्वरुपात प्राप्त झाली आहे. आता रक्कम वसुली बद्दल माझा वाद किंवा तक्रार राहीलेली नाही.

सदर शेतजमीन वर तुमचा प्रत्यक्षरित्या ताबाही यापुर्वीच करून दिले आहे. आता ताब्या संबंधी वाद किंवा तक्रार राहीलेली नाही. तुमच्या ताब्यात माझे वारसांनी अथवा इतर कोणीही कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास तो दुर करण्याची संपुर्ण जवाबदारी आमच्या वर आहे व राहिल.

सदर शेतजमीनच्या अनुषंगाने आमचे मालकी व कब्जाचे हक्क परिपुर्ण व निर्दोष असुन शासकिय कागदोपत्री आमचे नावे कायदेशीररीत्या मालकी हक्काची अंमलनोंद आहे. तुमचे मालकी हक्क परिपुर्ण करण्यासाठी आवश्यक असेल असा दस्तावेज आम्ही तुमच्या हक्कात विनामोबदला लिहुन व नोंदवून देईन. सदर विक्री शेतजमीनीच्या अनुषंगाने जालना जिल्हा न्यायालयात व इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मालकीहक्क व ताब्यासंबंधी वादविवाद चालु नाही. सदर विक्री शेतजमीन ही न्यायप्रविष्ठ नाही.

तसेच तुम्हास विक्री केलेल्या शेतजमीन वर कोणत्याही प्रकारचा सरकारी अथवा खाजगी कर्ज बोजा नसुन सदरची मिळकत कोणासही गंहाण, दान, तारण अथवा बक्षीस अन्य प्रकारे हस्तांतरीत केलेली नाही. तसेच कोणासही लेखी किंवा तोंडी विक्री किंवा विक्रीचा करार केलेला नाही. तसे काही आढळुन आल्यास ते निवारण करण्याची संपुर्ण जवाबदारी आमच्यावर आहे व राहील.

विक्री शेतजमीनीच्या संबधाने आज पर्यतचे येणारे सर्व कर / टॅक्स मालक या नात्याने भरलेले असुन यानंतर येणारे संपुर्ण कर टॅक्स तुम्ही विद्यमान मालक या नात्याने भरावेत.

सदरील विक्रीपत्र दस्त नोंदणीसाठी लागणारा संपुर्ण खर्च जसे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी चा भरणा दस्त लिहुन घेणार यांनी केलेला आहे.

सदर विक्री केलेल्या शेतजमिनीशी आता माझा किंवा माझ्या वारसांचा किंवा माझ्यातर्फे हक्क सांगणारांचा काहीही हक्क संबंध हितसंबंध राहिलेला नाही. सदरहू मिळकत आम्ही आमच्या वारसांच्या सल्ल्याने व संमतीने विक्री केलेली आहे.

विक्री शेतजमिनीचे आता तुम्हीच विद्यमान मालक व कब्जेदार झाला असुन सरकारी राजस्व कागदोपत्री तुम्ही आपल्या नावाने मालकी हक्क अंमल नोंदवावा त्यास लागणारे आमचे स्वाक्षऱ्यांचे सहकार्य आम्ही विनामोबदला देईन. विक्री शेतजमिनीचे तुम्ही इच्छेनुसार वंश परंपरांगत निरंतर उपभोग घ्यावा अथवा विल्हेवाट लावावी, त्यास माझा उजर, आक्षेप राहणार नाही. विक्री शेतजमिनीवर आता आमचा किंवा आमचे ईस्टेट वारसांचा कसल्याही प्रकारचा हक्क वं संबंध राहीलेला नाही.

विक्री शेतजमिनीशी आमचा किंवा आमच्या वारसांचा काहीही हक्क व संबंध राहिलेला नाही. सदर विक्री शेतजमिनीची आपण आपल्या मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावु शकता.

करीता हे विक्रीपत्र आम्ही आमच्या राजीखुशीने व स्वसंतोषाने तुमच्या हक्कात कायम स्वरुपी लिहुन दिले जे आमच्यावर व आमचे ईस्टेट वारसांवर सारखेचरित्या बंधनकारक आहे व राहील. जे सही असे फक्त दिनांक: टाईप- मो: -

विक्रीपत्र लिहुन देणार

विक्रीपत्र लिहुन घेणार

साक्षीदार :

1)

वय वर्षे,

रा.

फोटो
अंगठा

2)

वय वर्षे,

रा.

फोटो
अंगठा